
– मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील घटना
– पंधरे कुटुंबियांवर शोककळा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका ३२ वर्षीय विवाहीत युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ३० जून रोजी रात्री तालुक्यातील बोरी (गदाजी) येथे घडली.एन तारुण्यात विवाहीत युवकाच्या अवेळी एक्झिटने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राहुल दादाजी पंधरे (३२) रा.बोरी (गदाजी) असे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत पावलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे.ते रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
दरम्यान ३० जून रोजी राहुल हे आपल्या स्वगृही कुटुंबीयांसह झोपून होते.मध्यरात्री उशिरा त्यांना छातीत दुखू लागले. परिणामी कुटुंबीयांनी त्यांना प्राथमिक उपचाराकरिता खैरी येथील रुग्णालयात दाखल केले असता खैरी येथून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात येत असता वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
एन तारुण्याच्या भरात विवाहित युवकाच्या अशा अवेळी एक्झिटने समाजमन सुन्न झाले असून पंधरे कुटुंबीयांवर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत राहुल यांचे पश्चात गर्भवती पत्नी व एक मुलगी असल्याची माहिती आहे.