
– मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथील घटना
– परिसरात सर्वत्र हळहळ
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दिवसभर शेतात फवारणी करून घरी परतलेल्या युवकास फवारणीतून विषबाधा होऊन २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेदरम्यान तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे घडली.परिणामी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सागर सुधाकर राजूरकर (२३) रा.हीवरा (मजरा) असे फवारणीतून विषबाधा झाल्याने मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान १ ऑगस्ट रोजी सागर यांनी आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या मौजा फेफरवाडा शिवारातील शेतात दिवसभर फवारणी केली. फवारणी करून सागर घरी परतले असता रात्री अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सागर यांनी ही बाब कुटुंबीयांना सांगितली असता कुटुंबीयांनी सागर यांस वणी येथील रुग्णालयात नेत असता रात्री नऊ वाजेदरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
२३ वर्षीय युवकाच्या अशा अवेळी जग सोडून जाण्याने परिसरात सर्वत्र व्यक्त होत आहे.