
– ३ लाख ६० हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त
– २ ताब्यात – सुचना पत्रावर सुटका : २ फरार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मार्डी रस्त्यावरील सरोदे बेड्याजवळ संशयास्पद रित्या काही व्यक्ती १८ जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान मारेगाव पोलीसांना मिळाली.परिणामी पोलिसांनी घटनास्थळ गाठुन याबाबत विचारणा केली असता जनावरे कत्तली करीता नेत असल्याची कबुली ४ व्यक्तींनी दिली.परिणामी १८ जनावरे, २ संशयित आरोपी असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.यावेळी दोन संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयतांची सूचना पत्रावर सुटका करण्यात आली आहे.
उमेश जनार्दन चाफले (३२),शंकर संभा बोजेवार (३५), मारोती जगताप (४२),नरेश जनार्दन चाफले सर्व रा.मारेगाव चारही संशयित आरोपींची नावे आहेत.
दरम्यान २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजे दरम्यान मार्डी रस्त्यावरील सरोदे बेड्याजवळ काही व्यक्ती जनावरांना निर्दयीपणे बांधून घेऊन जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांना मिळाली.
आपल्या ताफ्यासह सावंत यांनी घटनास्थळ गाठले असता चारही व्यक्तींना जनावरां बाबत विचारणा केली असता त्यांचेकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच चारही संशयतांनी १८ जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याची कबुली दिली.
परिणामी पोलिसांनी १८ जनावरे (अंदाजे किंमत तीन लाख साठ हजार रुपये), २ संशयित आरोपींना ताब्यात घेतले.यावेळी दोन संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला.ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयतांची सूचना पत्रावर सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी चारही संशयित आरोपींवर प्राण्यांना कृरतेने वागविण्यासंबंधीच्या प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उप विभागीय अधिकारी व मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनात पि.एस.आय. ज्ञानेश्वर सावंत, जमादार आनंद अलचेवार,अफजल पठान, प्रमोद जिड्डेवार, रजनीकांत पाटील,अजय वाभीटकर यांनी पार पाडली.
ते चारही युवक कौतुकास पात्र..!
जनावरे संशयास्पद रित्या घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक युवक निखिल मेहता,अनुप महाकुलकार, विशाल किन्हेकार व रोशन पारखी यांचे निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना सूचना केल्याने कत्तली करिता घेऊन जात असलेल्या जनावरांची सुटका झाली.परिणामी चारही युवक कौतुकास पात्र आहे.