
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
उन्हाळी सुट्या असल्याने वरोरा येथील तीन मुले मारेगाव तालुक्यातील दांडगाव जवळुन वाहणाऱ्या वर्धा नदीवर पोहायला गेली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एका मुलाचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना ता. २६ मे रोजी घडली.
सध्या उन्हाळी सुट्टी सुरु आहे. त्यामुळे मुले सुटीचा आनंद घेण्यासाठी विविध प्रकारचे घरीच बसुन खेळ खेळतात तर काही मुले मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त असतात. सध्या सुर्यदेव आग ओकत असुन उष्मांक ४२ अंशाचा वर पोहचला आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतकाचे नाव मानव अविनाश राऊत (१५) आहे. दरम्यान ता.२६ मे रोजी वरोरा येथे (जिल्हा चंद्रपूर) शनिमंदिर परिसरात वास्तव्यास असलेली तीन समवयस्क मुले मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीवर असलेल्या मार्डा डॅम वर पोहण्यासाठी दांडगावच्या (ता.मारेगाव) बाजूने आले. दुपारी २ वाजेदरम्यान तीनही जन नदीत पोहायला उतरले. या तीघांपैकी मृतकास
पाण्याचा अंदाज न आल्याने नदीमध्ये बुडून करून अंत झाला.घटनेची माहीती मिळताच मृतकाचा शोध घेत असता अखेर ५ वाजेदरम्यान युवकाचा मृतदेह हाती लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घडलेली घटना अत्यंत दुःखद असुन,अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी समस्त पालकानी पाल्यांना सांभाळून ठेवावे असे आवाहन मारेगाव पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.